अलीकडेच पुण्याला बसने जाण्याचा योग आला. सर्व प्लानिंग व्यवस्थीत चालु असताना सरकारी बस ऐवजी रस्त्यात मिळालेल्या लग्जरी बस ने जाण्याची दुर्बुद्धी झाली.बस चांगली होती, सीट आरामदायी होत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगला वेग होता. आता शांत झोपून पुण्यात उतरायचे एव्ह्ढेच डोक्यात होते. पण सगळे व्यवस्थीत चालु असताना नक्की काहीतरी गडबड होणार असे वाटायला लागले. दुदैव जिथे तुम्हाला गाठणार असेल तिथे हतबल होवून ‘बघत रहाणे’ एव्ह्ढेच हाती राहणार अशी जबर्दस्त शंका यायला लागली. ह्या दुदैवाचे कारण ठरले समोर लागलेला चित्रपट, माझ्या अगदी मागे बसलेले दोन ‘फ्रंट बेंचर्स’ आणि बाजूला बसलेले दोन तरूण.
सर्वात अगोदर निगेटिव मध्ये एक गाणे चालू झाले आणि त्यावर इतर कलाकारांची नावे येत होती. पण मुख्य कलाकार कोण आणि चित्रपटाचे नाव काय हे अजून गुलदस्त्यातच होते. मागे कॉमेंट्री सुरु झाली. ‘आरारा... असलं कसलं गाणं’ ‘आरं थाम्ब रं.. अजून सरळ चालू व्हवू दे’. तिकडे बाजूला बसलेल्या दोन तरूणाना त्यांच्या भविष्याचा अंदाज आला होता असे दिसले. त्यांची कुजबूज चालू झाली. ‘हिमेश, एक्स्पोज, रेशमिया, नविन पिच्चर’ असे शब्द घरंगळत माझ्या कानावर आले. आता नावातही रेशमिया प्रभूतींची नावे दिसणे सुरु झाले होते, पण पिच्चरचे नाव काही केल्या येत नव्हते.
मग मुख्य पिच्चर सुरु झालं. सुरुवातीलाच एक ख्रिश्चन बाईचे प्रेत पूरायला नेत असतात. मग एक एक करून बाईचे नातेवाइक आणि मित्रमंडळी येताना दिसतात. पार्श्वभूमिवर त्यांची ओळख करून दिली जात असते.मग चित्रपटाचे नाव झळकले ‘द एक्स्पोज’. एक मेलेली नटी आणि चित्रपटाची पार्श्वभूमि म्हटल्यावर ही ‘मडर मिश्ट्री’असणार हे आम्ही ओळखलेच. मग नाव ‘द एक्स्पोज’ कसे हा प्रश्न पडला. पुढे असे बरेच प्रश्न पडायचे होते. तर..रेशमिया कंपनीच्या चित्रपटात हिरो कोण ते वेगळे सांगायला नको. तो हिमेश (तोच तो - हिमेश रेशमिया – रेशमिया विथ डबल यम) पिच्चरमधेही हिरोच असतो. पण तो साउथ आणि हिंदी अश्या दोन्हिही इंडस्ट्रीमधे ‘सुपर हिरो’ असतो. मीच माझे डायलोग बोलणार, मीच लोकेशन ठरवणार, मीच सर्व काही.. ही हिरोच्या पात्राची मग्रूर व्रुत्ती पिच्चरभर दिसत राहते.
![]() |
‘सुपर हिरो?' |
तर दोन प्रतिस्पर्धी कॅम्प्स नवीन ट्रेंडचे पिच्चर बनवत असतात. एक ‘रीना मेरा नाम’ आणि दूसरा ‘उज्ज्वल,निर्मल्, शीतल’.दोन नट्या, ज्या एकत्र राहत असतात, त्या ह्या प्रतिस्पर्धी कॅम्प्सचे पिच्चर करत असतात. ‘उज्ज्वल, निर्मल्, शीतल’ मधे आपला हिरो असतो बरं का.
मग पुढे पिच्चर रिलीज होताना पॉलिटिक्स सुरु होते. कोण सुपर हिट होणार ह्याची शर्यत लागते. मग एक अवार्ड ची पार्टी असते. त्यात ‘उज्ज्वल, निर्मल्, शीतल’ ची ख्रिश्चन नटी वरच्या मजल्यावरून पडून मरते. झाला की नाही घोळ ? मग आता हिरोला हिरोगिरी करायला चांगला ‘चानस घावतो’. ‘उज्ज्वल, निर्मल्, शीतल’ फ्लॉप होणार असतो म्हणून त्याच्या दिग्दर्शकाने तिला मारले की ती कुणाच्या लफड्यात अडकून मेली ह्याचा शोध आपला हिरो घेतो (आणि आमचा अंत पाहतो).कोर्टात खून्याना एक्स्पोज करून त्याना सजा देताना तो आपलाही मतलब साधून घेतो.
![]() |
‘रीना मेरा नाम’ |
![]() |
‘उज्ज्वल, निर्मल्, शीतल’. |
मग पुढे पिच्चर रिलीज होताना पॉलिटिक्स सुरु होते. कोण सुपर हिट होणार ह्याची शर्यत लागते. मग एक अवार्ड ची पार्टी असते. त्यात ‘उज्ज्वल, निर्मल्, शीतल’ ची ख्रिश्चन नटी वरच्या मजल्यावरून पडून मरते. झाला की नाही घोळ ? मग आता हिरोला हिरोगिरी करायला चांगला ‘चानस घावतो’. ‘उज्ज्वल, निर्मल्, शीतल’ फ्लॉप होणार असतो म्हणून त्याच्या दिग्दर्शकाने तिला मारले की ती कुणाच्या लफड्यात अडकून मेली ह्याचा शोध आपला हिरो घेतो (आणि आमचा अंत पाहतो).कोर्टात खून्याना एक्स्पोज करून त्याना सजा देताना तो आपलाही मतलब साधून घेतो.
साठीच्या दशकातली सुंदर वातवरण निर्मीती, बर्या पैकी ‘मुजिक’, चांगली निर्मिती मूल्ये ह्या चित्रपटाच्या चांगल्या बाजूंवर कोण बोळा जर फिरवत असेल तर तो आपला हिरो. त्याच काळातल्या एका माजोरड्या हिरोची आठवण करुन देणारा हिरो साकारताना हिमेश जे बोलत होता त्याची हळू हळू कॉमेडी व्हायला लागते. मागे बसलेले ‘फ्रंट बेंचर्स’ आणि बाजूचे दोन तरूण ह्यांची हसून पुरेवाट झाली.मग मी ही स्वतःला सावरू शकलो नाही. दिग्दर्शकाचा चांगल्या प्रयत्नाला कथा, पट कथा, अभीनय यांची कशाचीही जोड नाही (मग कसा चालेल पिच्चर).
![]() |
कॉमेडी पिच्चर |
जाताजाता हिमेशचा एक सॅम्पल डायलॉग – ‘इतना खून तुम्हारे शरीर मे नही है जितना हम एक बार मे मू* देते है’. (बाळ हिमेश, अजीत दादा तुझे दोस्त आहेत काय रे? आणि तु काय रक्त मू*त असतोस काय ?).
आणि शेवटी दुदैवाची आणखी एक गोष्ट........
परत येतानाच्या बस मध्ये तोच चित्रपट लागला होता. मग आता काय म्हणणार – ‘अरे देवा’ !
No comments:
Post a Comment