आजच सिंघम रिटर्न्स बघीतला. आता मी तुम्हाला त्याची स्टोरी सांगणार आहे.
बाजीराव सिंघम आता गोव्यातुन मुंबईत आलेला असतो. आता तो मुंबईत डी.सी.पी. म्हणून काम बघत असतो.ह्या वेळी तो आय.पी.यस. असतो. त्याचा एक इमानदार हवालदार एका अॅक्सीडेंट मधे कोट्यावधीच्या कॅश बरोबर मेलेला सापडतो. मग मेडिया, पॉलिटिशियन वगैरे सगळे बाजीरावच्या मागे लागतात.
तिकडे राज्यात आघाडीचे सरकार चालू असते. आघाडीत एक खर्र्यांचा पक्श्य असतो आणि दूसरा खोट्यांचा पक्श्य असतो. खरे लोक येणार्या ईलेक्शन मधे आघाडी मोडून सर्व जागा लढविणार असतात. त्यांचे उमेदवार म्हणून त्यानी बर्याच ‘मेणबत्तीवाल्याना’ गोळा केलेले असते. ते सगळे निवडून येणार म्हणून खोट्यांचा पक्श्य तणतणत असतो. पुढे तर खोट्यांचा पक्श्यातील एक ‘विलन नेताजी’ आणि एक ‘बाबा महाराज’ हे खर्यांच्या नेत्याला मारून टाकतात.त्याना वाचविण्यात बाजीराव सिंघम अपयशी ठरतो. टीका वगैरे होते म्हणून तो राजीनामा देवून निघून जातो.
![]() |
बाबा महाराज आणि विलन नेताजी’ |
कट टू खेडेगाव:खेडेगावात बाजीराव ‘खान मस्तानी’ बरोबर रोमांस करता करता हवालादाराच्या आणि खरे पार्टीच्या नेत्याच्या खूनाचे गूढ शोधन्याचा प्रयत्नात असतो. कारण ? कारण त्याने राजीनामा दिलेलाच नसतो ना! पुरावा सापडतो. मग तो पुराव्यानिशी मुंबईत यायला निघतो. तो पुरावा म्हणजे रंगेहाथ पकडलेला एक हस्तक - म्हणजेच‘की विट्नेस’. त्या ‘की विट्नेस’ वर जीवघेणा हल्ला होतो. ‘की विट्नेस’ कोमामधे जातो. तो कोमातून बाहेर येईपर्यंत बाजीरावची गोची होते. मग तोपर्यत तो सगळ्याना दम टाकत हिंडतो. ‘की विट्नेस’ कोमातून बाहेर येतो. बाजीरावच्या ईमोशनल ब्लॅक मेलला बळी पडून तो कोर्टात साक्श्य द्यायला तयार होतो. त्याच्या जीवावर बाजीराव परत सगळ्याना दम टाकत हिंडतो आणि बाबा महाराजला अटक करतो. बाबा महाराजला अटक करताना त्याचे अनुयायी गोंधळ घालतात आणि जाळपोळ करतात म्हणून बाजीराव त्याची धिंड काढतो.
साक्श्य द्यायच्या वेळी विलन नेताजी आणि बाबा महाराज, ‘की विट्नेस’ वर पुन्हा जीवघेणा हल्ला करवतात आणि त्याला कोर्टात मारून टाकतात. बाजीरावची पुन्हा गोची होते. पण तो सिंघम असतो ना, म्हणून मुख्यमंत्र्याना तो शर्ट काढून (पुन्हा एकदा)राजीनामा देवून टाकतो. पण ह्या वेळी मात्र तो डी.जी.पी. सकट सगळ्याना चिथवतो. मग ते ही सगळे शर्ट काढून राजीनामा देवून टाकतात. त्या प्रसंगात बाजीराव खान मस्तानीला ‘तु काय करनार म्हणून विचारतो’, तर ती त्याला (फक्त) तोंडीच पाठींबा देते.
बाजीराव मग ते फक्त बंडीत(बन्यन मधे) असणारे पोलिस घेवून विलन नेताजी आणि बाबा महाराजच्या घरावरएक बंडी यात्राच काढतो. त्या दोघांच्या अनूयायाना बंडी यात्रेकरू पळवून लावतात. त्या दोघांच्या पार्श्वभागात गोळ्या घालून तो त्यांच्याकडून खरे खोटे वदवून घेतो. मेडियावाली एक बाई ते टीव्हीवर लाईव दाखवते आणि बाजीराव सकट प्रेक्श्यकांचीही सुटका करते. आता विलन नेताजी आणि बाबा महाराजची गोची झाल्यामुळे निवडणुकीत झाडून सगळे मेणबत्तीवाले निवडून येतात आणि सरकार स्थापन करतात.
![]() |
खान मस्तानी |
No comments:
Post a Comment